Tuesday, May 26, 2026
Homeमुंबईअल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त सर्व शैक्षणिक संस्थांना नव्याने अर्ज करून प्रमाणपत्र मिळवीण्याचे...

अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त सर्व शैक्षणिक संस्थांना नव्याने अर्ज करून प्रमाणपत्र मिळवीण्याचे निर्देश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक दर्जा मिळविणाऱ्या शाळांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे.जुलै २०१७ पूर्वी अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र मिळवलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांना नव्याने अर्ज करून प्रमाणपत्र मिळवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.पुढील सहा महिन्यांत ऑनलाईन अर्ज करूनच हे प्रमाणपत्र संस्थांना मिळवावे लागणार आहे.मागील सरकारच्या काळात चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे काही शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत.त्यातच आता २०१७ पूर्वी दर्जा मिळविणाऱ्या सर्वच संस्थांना नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यात जुलै २०१७ पासून अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.परंतु,त्याआधी सरकारच्या इतर विभागाच्या सक्षम प्राधिकारी यांनी तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगाकडूनही कायमस्वरूपी दर्जा प्रमाणपत्र दिले जात होते. प्रमाणपत्र मिळविलेल्या शैक्षणिक संस्थांनी नव्याने सुरू केलेल्या किंवा हस्तांतरणाद्वारे चालविण्यास घेतलेल्या धार्मिक अथवा भाषिक अल्पसंख्याक दर्जाच्या शाळा, महाविद्यालयांना असलेल्या तरतुदींचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
तसेच जुलै २०१७ पूर्वी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांचा तसेच ते चालवत असलेल्या शाळा,
महाविद्यालयांचा तपशील सरकारकडे उपलब्ध नाही. संस्थांच्या दर्जा प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करून संस्थांचा अभिलेख अद्ययावत करणे आणि अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन नोंदणीद्वारे नवे प्रमाणपत्र मिळविण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!