Tuesday, May 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षल्यांकडून एक ग्रामस्थ व एका शिक्षकाची हत्या..

नक्षल्यांकडून एक ग्रामस्थ व एका शिक्षकाची हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती बुधवारी १९ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरी होत असतांना छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका स्थानिक शिक्षकासह एका ग्रामस्थाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे.बुधवारच्या रात्री नक्षलवाद्यांच्या एका गटाने दंतेवाडा,विजापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तोडामा गावात प्राथमिक शाळेतील शिक्षादूत(शिक्षक) बमन कश्यप वय २९ वर्षे आणि ग्रामस्थ अनिस राम पोयम वय ३८ वर्षे यांच्या घरी प्रवेश केला.दोघांनाही घरून उचलून नेत जंगलात घेऊन गेले.त्यानंतर नक्षलवाद्यांनी दोघांचीही हत्या केली. हत्येनंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी एक पत्रक सोडले. पत्रकात बमन कश्यपने ऑक्टोंबर २०२४ मध्ये थुलथुली चकमकीपूर्वी दंतेवाडा पोलिसांना माओवाद्यांच्या हालचालींबद्दल माहिती पुरवल्याचे पत्रकात नमूद केले आहे,असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. दंतेवाडा-नारायणपूर सीमेवरील थुलथुली आणि नेंदूर गावांमधील जंगली भागात सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या चकमकीत तब्बल ३८ माओवादी ठार झाले होते.घटनेची माहिती मिळताच,दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर पोलिसांचे एक पथक गावात पाठवण्यात आले.पोलिस पथकाने मृतदेह ताब्यात घेतला.यासोबतच नक्षलवाद्यांनी सोडलेले एक पत्रही जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.बस्तर भागात नक्षलवादी अनेकदा गावकऱ्यांना पोलिसांचे खबरी असल्याचा आरोप करून मारतात.यापूर्वी,४ फेब्रुवारी रोजी नक्षलवाद्यांनी पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून दंतेवाडा जिल्ह्यात एका ३० वर्षीय व्यक्तीची हत्या केली होती. छत्तीसगडमध्ये सध्या त्रिस्तरीय पंचायत निवडणुका होत आहेत.त्यामुळे  निवडणुकीत मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी नक्षलवाद्यांनी अमानवीय कृत्य घडवून आणले आहे. घटनेने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!