Friday, September 4, 2026
Homeनागपूरचक्क चालत्या वाहनावर कोसळला ६० किलो वजनाचा सिमेंटचा गोळा; कार चालक जखमी..

चक्क चालत्या वाहनावर कोसळला ६० किलो वजनाचा सिमेंटचा गोळा; कार चालक जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-चालत्या चारचाकी वाहनावर उड्डाणपुलाचा ६० किलो वजनाचा सिमेंटचा गोळा कोसळल्याने कारचा वरील भाग दबल्या गेला तर कार चालक जखमी झाल्याची घटना आज,शुक्रवारी २१ फेब्रुवारीला नागपूरच्या प्रजापती नगर चौक,एचबी टाऊन परिसरात घडली.यात कारचालक विशेष श्रीवास्तव किरकोळ जखमी झाले.घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला म्हणून घटनास्थळी धाव घेतली.विशेष श्रीवास्तव हे कार क्रमांक-एमएच ३१ एफआर १४५५ ने प्रजापती नगर परिसरातून जात होते.त्यातच चालत्या कारवर पारडी उड्डाणपुलाचा ६० किलो वजनाचा एक सिमेंटचा गोळा पडला.उड्डाणपुलाचा गोळा पडताच कार चालकाची भंबेरी उडाली.यात कारचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.उड्डाणपुलाच्या भागाला तडे गेल्याने आणखी अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे प्रशासनाने उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!