Monday, July 13, 2026
Homeमुंबईअल्पवयीन मुलीचा हात धरून 'आय लव्ह यू' म्हणणे तरुणाला पडले महागात…-न्यायालयाने सुनावली...

अल्पवयीन मुलीचा हात धरून ‘आय लव्ह यू’ म्हणणे तरुणाला पडले महागात…-न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-अल्पवयीन मुलीचा हात धरून ‘आय लव्ह यू’ म्हणणाऱ्या तरुणाला मुंबईच्या विशेष पोक्सो न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.न्यायमूर्ती अश्विनी लोखंडे म्हणाल्या की,आरोपीच्या शब्दांनी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला.सदर आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.पण न्यायालयाने त्याची यातून सुटका करत त्याला आयपीसी अंतर्गत शिक्षा सुनावली.

पीडित पक्षाच्या माहितीनुसार,ही घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली होती.तेव्हा मुलीच्या आईने तिला किराणा सामान घेण्यासाठी दुकानात पाठवले होते.त्यावेळी १९ वर्षीय आरोपीने वाटेत मुलीचा पाठलाग केला.संधी मिळताच त्याने तिचा हात धरला आणि अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणाला.मुलगी रडत घरी परतली आणि तिने हा सगळा प्रकार आईला सांगितला.त्यानंतर आईने साकीनाका पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

तरुणाने आरोप खोटे ठरवले आणि सांगितले की,त्याचे मुलीशी प्रेमसंबंध होते आणि घटनेच्या वेळी तिनेच त्याला भेटायला बोलावले होते.या खटल्यात मुलगी आणि तिच्या आईसह ४ साक्षीदारांची चौकशी झाली.

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुलीचे आरोपीसोबत संबंध असते तर तिने भीतीपोटी ही घटना आईला सांगितली नसती.कोर्टाने सांगितले की,या घटनेनंतर आरोपीने मुलीच्या आईलाही धमकावले होते.न्यायमूर्ती लोखंडे म्हणाल्या की,मुलगी आणि तिच्या आईचे म्हणणे एकमेकांशी तर्कसंगत आहे.दोघींनीही प्रेमप्रकरणाची बाब नाकारली. आरोपीला त्याचे खंडन करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सादर करता आला नाही.

मुलीशी बोलणे म्हणजे लैंगिक छळ नाही; यापूर्वी अन्य एका प्रकरणात विशेष पोक्सो न्यायालयात विशेष न्यायमूर्ती कल्पना पाटील यांनी एका आरोपीला कोणत्याही मुलीशी बोलणे म्हणजे लैंगिक छळ नाही; असे म्हणत निर्दोष मुक्त केले होते.कोर्टाने सांगितले की,या प्रकरणातील मुलीने कधीही आरोपीशी बोलण्यास अनास्था व्यक्त केली नाही.

हे प्रकरण २०१७ मधील मुंबईतील कुर्ला भागातील आहे.ज्यामध्ये आठवी वर्गातील एक विद्यार्थिनी शाळा संपवून घरी परतत होती.वाटेत आरोपी तरुणाने तरुणीला तिच्याशी बोलण्यासाठी थांबवले.मुलीने घरी पोहोचून घरच्यांना याबाबत तक्रार केली.यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!