Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीलाच प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात…-गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसात दोन कारवाया…

लाच प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात…-गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसात दोन कारवाया…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-सातबाऱ्यातील तीन जणांची नावे वगळण्याच्या कामासाठी ६ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने काल, शुक्रवारी,२ ऑगस्ट ला अहेरी तालुक्यातील महसूल विभागाचा मंडळ अधिकारी आणि तलाठ्यास रंगेहाथ अटक केली आहे.भूषण जौंजाळकर तसेच अहेरी तालुक्यातील चिचगुंडी गावचा प्रभारी तलाठी व्यंकटेश जल्लेवार असे लाच घेणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचे नाव आहे.

विशेष म्हणजे,महसूल विभागाद्वारे महसूल सप्ताह दिन साजरा केला जात असताना याच विभागाचे कर्मचारी लाच स्वीकारतांना अडकल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.संबंधित तक्रारदारास सातबारावरुन तिघांचे नाव वेगळे करायचे होते. यासाठी चिचंगुडीचे तलाठी जल्लेवार यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केले होते.मात्र सदर कामासाठी तलाठ्याने ९ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ६ हजार रुपये देण्याची तक्रारदाराने तयारी दर्शविली.

१ ऑगस्टला लाच मागणी केल्याप्रकरणी धानोरा तालुक्यातील बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता अक्षय आगळे यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर २ ऑगस्टला अहेरीत मंडळाधिकारी व तलाठ्यास लाच घेताना पकडले.२४ तासांत दोन कारवायांत तिघांना जेरबंद केल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!