उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया (नवेगावबांध) :- क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडींग करावयाचे असल्याने पाठविलेल्या लिंकमधील ओटीपी सांगण्याचा बहाणा करून खात्यातून एक लाख ९३ हजार ३८० रुपये अन्य खात्यात ट्रान्सफर करण्यात आली असल्याची घटना बुधवारी २२ फेब्रुवारी ला घडली.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील शेतकरी भास्कर सुखदेव बाळबुद्धे वय ४० वर्षे यांना बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी त्यांना मोबाइल क्रमांकावर कॉल आला व ॲक्सिस बँक येथून बोलतो,तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडींग करायचे आहे काय? असे विचारण्यात आले.यावर बाळबुद्धे यांनी होकार दिला असता समोरील व्यक्तीने त्यांना मोबाइलमधील ॲक्सिस बँकेचे ॲप सुरू करा,असे सांगितले. त्यानुसार,बाळबुद्धे यांनी ॲक्सिस बँकेचे ॲप सुरू केले व मला काही समजत नाही.असे त्या व्यक्तीला सांगितले.यावर त्या व्यक्तीने,एक लिंक पाठवित असून, त्यावर ती लिंक ओपन करून सांगा असे बोलून एक साधा मेसेज पाठवला.ती लिंक उघडली असता त्यावर एक ओटीपी आला आणि लगेच बाळबुद्धे यांच्या खात्यातून एकदा ४९ हजार ७९३ रुपये व दुसऱ्यांदा एक लाख ४३ हजार ५८७ रुपये असे एकूण एक लाख ९३ हजार ३८० रुपये खात्यातून कमी झाले.सदर प्रकार लक्षात येताच आपली फसवणूक झाली असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात येतच,त्यांनी जिल्हा सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.