Friday, May 1, 2026
Homeनागपूरअन् वेचणीला निघालेल्या महिलांनी मिळेल त्या दिशेने काढला पळ..!

अन् वेचणीला निघालेल्या महिलांनी मिळेल त्या दिशेने काढला पळ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पिंजऱ्यातील वाघाची डरकाळी ऐकली की समोरचा हादरून जातो.पण,वाघोबा अन् तोही झुंड घेऊन निघाल्यावर काय होईल,याचा थरारक अनुभव काही महिलांनी घेतला.कापूस वेचण्यासाठी काही महिला सकाळीच रस्त्याने निघालेल्या… काही अंतर पार करताच रस्त्याने डुलत-डुलत एकापाठोपाठ एक असे चार वाघ आले…. मग काय सर्वांचीच बोबडी वळली… काय करावे एकीलाही सुचेना..! सगळ्यांची आरडाओरड सुरू झाली… गोंधळाच्या आवाजाने वाघांनीही आपला मार्ग बदलला अन् वेचणीला निघालेल्या महिलांनीही मिळेल त्या रस्त्याने पळ काढला.भिवापूर तालुक्यातील बेसूर शेतशिवारात सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.त्यामुळे दिवसभर गाव व शेतशिवारात महिलांना एकाचवेळी चार वाघ दिसल्याची एकच चर्चा होती.
बेसूर येथील दौलतराव धोटे यांचे शेत चिखलापार नदीलगत अगदी मुख्य रस्त्यालगत आहे. काल,शुक्रवारी सकाळी ७-८ वाजताच्या सुमारास मुख्य रस्त्यावरून एकामागोमाग चार वाघ रस्ता ओलांडून दौलतराव धोटे (गुरुजी) यांच्या शेतात जातांना प्रवाशांना दिसले.सुभाष गिरडे यांचे शेत लगतच आहे.त्यांच्या शेतात कापूस वेचणाऱ्या महिलांना धोटे यांच्या शेतात चार वाघ दिसताच त्या भांबवून गेल्या.त्यांनी आरडाओरडा करीत पळ काढला.आवाजाने वाघांनी आपला मार्ग बदलवला आणि नदीकडे निघून गेले.चार वाघ असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात व परिसरात पसरली. एक वाघीण व तीन तिचे पिल्ले असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.वनविभागाचे कर्मचारी तिथे पोहोचले व परिसर पिंजून काढला.
ताडोबा,गोरेवाडा,पेंच,उमरेड-पवनी- कन्हांडला,बोर अशी अभयारण्ये वाघ,बिबट,अस्वल आदी वन्यप्राण्यांचे घर म्हणून ओळखले जातात आणि ही सर्व नागपूरला लागून असल्याने पर्यटकांचा ओढा कायम तिकडे असतोच.पर्यटकांसाठी हे वन्यप्राणी रंजन करत असले तरी स्थानिकांसाठी हेच वन्यप्राणी भयाण संकट ठरत असतात.विशेषतः शेतकऱ्यांना तर जीवन- मरणाचाच प्रश्न असतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!