Sunday, May 3, 2026
Homeचंद्रपूरअन् महिलांचा झाला दिमाक खराब; चक्क ग्रामपंचायतीलाच लावले टाळे..!

अन् महिलांचा झाला दिमाक खराब; चक्क ग्रामपंचायतीलाच लावले टाळे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सहन करायचे झाले म्हणून किती सहन करावे,सहनशीलतेचा बांध जेव्हा फुटतो,तेव्हा साधा माणूसही विक्राळ अवतारात दिसू लागतो.अश्याच प्रकारे आज येईल,उद्या येईल म्हणता-म्हणता दोन आठवडे निघून गेलीत.पण नळाला पिण्याचे पाणीच येईना.! त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी चक्क ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकल्याची घटना काल, गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे घडली.व्याहाड खुर्द येथे जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ योजनेतंर्गत चंद्रपूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागा मार्फत ४ कोटी ९० लाख ५७ हजार रुपयांची नळयोजना सुरू करण्यात आली. योजनेत व्याहाड खुर्दसह दोन गावांचा समावेश आहे. सुरुवातीला पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून योजनेत तांत्रिक बिघाडीने  पाणीपुरवठा ठप्प झाला.अश्यातच दोन आठवड्याचा कालावधी लोटूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.त्यातच हल्ली पावसाचे दिवस असून गावातील विहीर व बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नाही.अशातही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने व घटनेच्या दिवशी ग्रामपंचायतीत जाऊन कुणीही उपस्थित नसल्याने नाईलाजास्तव दिमाक खराब होऊन उपस्थित महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूपबंद केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!