Sunday, May 3, 2026
Homeगडचिरोलीएमपीएससी व इतर मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण.. - प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा...

एमपीएससी व इतर मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण.. – प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या वतीने मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC),जिल्हा निवड समिती,IBPS (बँकिंग) व SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) परीक्षांसाठी सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडे शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच रोजगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे.प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने (३.५ महिने)असून  प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार अभ्यासपुस्तकांचा संच आणि अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार  आहे.इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १ जुलै २०२५ ते २८ जुलै २०२५ या कालावधीत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली येथे सादर करावेत.यासंदर्भातील मुलाखत २९ जुलै २०२५ रोजी शासकीय संकुल,बॅरेक क्र.२,गडचिरोली येथील मार्गदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी निर्धारित दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.अधिक माहितीसाठी मो.क्र.८४८५८१४४८८ वर संपर्क साधावा,असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!