उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी १५ दिवसांपूर्वी विविध संघटनांच्या वतीने ब्रम्हपुरी येथे आंदोलन करण्यात आले होते.त्यानुसार पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्ता करीता अनेक पोलिसांच्या ड्युटी लावण्यात आल्या होत्या. अशातच एकीकडे आंदोलन सुरू असतांनाच; उन्हाच्या तडाख्यामुळे वा इतर कारणांमुळे दोन पोलीस कर्मचारी वर्दिवरच असतांना बियर पिण्याचा त्यांना मोह आवरला गेला नसावा; त्यामुळेच एका बियर शॉपीमध्ये गेले व दारूचा मनसोक्त आनंद लुटीत होते.अशातच ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांना सदर प्रकाराची माहिती मिळताच; तिघेजण वर्दिवरच बियर बार मध्ये दिसून आल्याने सदर प्रकरणाची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक परदेशी यांना दिली.त्यानुसार संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोलीस कर्मचारी उमेश मस्के व नरेश निमगडे यांना निलंबित करण्यात आले आहे.तिसरा व्यक्ती दारू पीत नसल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचे कळते.
कर्तव्य बजावत असतांना दारू ढोसण्याचा हल्ली प्रकार देसाईगंज,आरमोरी व इतरही तालुक्यात सुरू असून शासकीय अधिकारी,कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी साईटवर जाण्याच्या बहाण्याने वा इतर कारणे समोर करून कार्यालयाची सुट्टी होण्यापूर्वीच बार मध्ये व इतर ठिकाणी दारूच्या अड्ड्यांवर तासनं-तास दारू ढोसून गप्पा-गोष्टीत रंगत असल्याचा प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे.अशांची बार मधील सीसीटिव्ही फुटेज तपासल्या गेली तर सर्वांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.अशांवर त्वरित आळा घातला जावा; अन्यथा ‘शासकीय काम व थोडे दिवस थांब’ अशी सर्वसामान्य जनतेची गळचेपी झाल्याशिवाय राहणार नाही.