उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली,चामोर्शी,धानोरा,आरमोरी,वडसा,कुरखेडा,व कोरची तालुक्यातील अनुसूचित जमाती करीता उत्पन्न वाढीच्या योजना,प्रशिक्षणाच्या योजना व मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना राबविण्यात येत आहेत. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता केंद्रवती अर्थसंकल्प योजना अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये योजना मंजूर आहेत.करीता ईच्छुक उमेदवारांकडून विहीत नमुण्यात ८ फेब्रुवारी पासून ७ मार्च २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे विनामुल्य उपलब्ध आहेत.तरी ईच्छुक लाभार्थ्यांनी संपुर्ण भरलेले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह जात प्रमाणपत्र,रहिवासी दाखला,उत्पन्न दाखला,उत्पन्न प्रमाणपत्र,जमिनीचा सातबारा,आधार कार्ड, फोटो, गटाकरीता नोंदणी प्रमाणपत्र,बँक पास बुक,ईत्यादी.८ फेब्रुवारी पासून दिनांक ७ मार्च २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे.अधिक माहिती करीता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली येथे संपर्क साधावा.असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवारी विकास प्रकल्प गडचिरोलीचे मैनक घोष यांनी कळविले आहे.