Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजअजब-गजब कारभार…भूमिपूजन करून कामही सुरू झाले; मात्र दीक्षाभूमी सौंदर्यीकरणाबाबत समाज बांधव अनभिज्ञ…देसाईगंज...

अजब-गजब कारभार…भूमिपूजन करून कामही सुरू झाले; मात्र दीक्षाभूमी सौंदर्यीकरणाबाबत समाज बांधव अनभिज्ञ…देसाईगंज बौद्ध समाज कोअर कमेटीच्या सभेत केले विचारमंथन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-बौद्ध समाज कोअर कमेटी देसाईगंजच्या वतीने आयोजित सभेत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.निर्णय घेत असतांना देसाईगंज दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाबाबत चर्चा करण्यात आली.काम सुरू करण्यापूर्वी दीक्षाभूमी बौद्ध समाज घटकातील कमिटीचे अध्यक्ष,सचिव,उपाध्यक्ष,कोषाध्यक्ष,सदस्य व इतर बौद्ध बांधवांना माहिती देणे आवश्यक होते. मात्र,दीक्षाभूमी सौंदर्यीकरणाबाबत कुठल्याच प्रकारची माहिती समाज बांधवांना न देता भूमीपूजन करून कामही सुरू केल्याने अजब-गजबचा कारभार सदर प्रकारावरून दिसून येत असल्याचे देसाईगंज बौद्ध समाज कोअर कमेटीने म्हटले आहे.सदर सुरू असलेल्या कामाची माहिती वृत्त पत्रातील बातमीवरुन कळले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे दीक्षाभूमी मध्ये सुरू असलेली कामे कोण करवून घेताहेत? याबाबत कोणाला कायदेशीर अधिकार आहेत? व सदर कामाचे अंदाजपत्रक काय आहे? कशाप्रकारे काम केले जात आहे? कामासाठी किती निधी मंजूर करण्यात आली आहे?याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कमेटीच्या वतीने लवकरच शिष्टमंडळ वरिष्ठ कार्यालयास भेट देण्यात येणार असल्याचा ठराव सभेदरम्यान मंजूर करण्यात आला आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी बौद्ध समाज कोअर कमेटीचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कमेटीचे कायदेशीर सल्लागार ॲड.बाळकृष्ण बांबोळकर,सल्लागार अशोक बोदेले,विजय बन्सोड, राजरतन मेश्राम यांनी स्थान भुषविले होते.प्रमुख अतिथी म्हणून कमेटीचे सल्लागार इंजि.नरेश मेश्राम , डाकराम वाघमारे,सचिव हंसराज लांडगे,कोषाध्यक्ष सुरज ठवरे,उपाध्यक्ष साजन मेश्राम,अनिता मेश्राम, सुनील सहारे यांनी स्थान भुषविले.

सभेदरम्यान वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ संबोधी बुद्ध विहारातून करणे,या कालावधित अन्य बुद्ध विहारांंना भेटी देणे,विविध विषयांवर मार्गदर्शन करणे आदि विषयांवर मंथन करून ठराव पारित करण्यात आला. या दरम्यान प्रभु वैद्य पदवीधर शिक्षक यांना नव्याने सदस्य म्हणून कमेटीत सहभागी करून घेण्यात आले. सभेचे संचलन हंसराज लांडगे तर आभार पुरुषोत्तम बडोले यांनी मानले.सभेला बौद्ध समाज कोअर कमेटीचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!