- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शेतकरी व टेम्पो चालक टेम्पोमध्ये बैलजोडी घेऊन जात असतांना वाटेतच एका वाहनातून दोघे उतरून टेम्पो अडवतात व जप्तीच्या कारवाईचा धाक दाखवून दोनशे रुपये मागणी करून घेऊन जातांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर ९ एप्रिल २०२५ रोजी व्हायरल होताच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर प्रकरणी संताप व्यक्त करून दोनशे रुपये घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडे केली होती.त्यानुसार आता ब्रम्हपुरी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३८४,३४ आणि पशू संरक्षण कायद्यांतर्गत कलम ५ बीएनएच अन्वये गुन्हा दाखल केला आहे.यात देवराव नवघरे व विनोद उपासे अशी आरोपींची नावे असून दोघेही ब्रम्हपुरी अर्बन बँकेचे कर्मचारी आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची घटना ही ३० मार्च २०२५ रोजीची आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल तालुक्यातील चांदाडा येथील ४२ वर्षीय शेतकरी भुजंग किसान नागपूर यांनी ३० मार्च रोजी ब्रम्हपुरी येथील बैल बाजारातून दोन बैल खरेदी केले होते.खरेदी केल्यानंतर बैलजोडी भाड्याच्या टेम्पोने नेत असतांना गांगलवाडी येथील तलावाजवळ ब्रम्हपुरी अर्बन बँकेच्या कर्ज वसुली पथकातील आरोपींनी आपले चारचाकी वाहन टेम्पोसमोर उभे करून त्यांना अडविले.त्यावेळी आरोपींनी गोरक्षक असल्याचा दावा करत दमदाटी केली आणि दोन हजार रुपयांची मागणी केली.तुमचे वाहन जप्त करू कां,काय आहे तर पहा..त्यावर शेतकरी आम्ही गरीब लोकं आहोत,शेतीसाठी बैलजोडी घेऊन चाललोय, दोनशे रुपये घेऊन टाका..यावर एकजण म्हणतो की,दोनशे रुपयात कां होते..नंतर काही वेळातच दोनशे रुपये घेतो व टेम्पो चालकाशी हुज्जत घालून आपल्या वाहनात निघून जातात.या घटनेचा व्हिडिओ टेम्पोमधील एकाने शूट करून समाजमाध्यमांवर व्हायरल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून कारवाईची मागणी केल्याने अखेर दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेतकरी रात्रंदिवस शेतात काम करून घाम गाळत असतात.मात्र,काही अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करीत असतात. अश्यांना धडा शिकवणे गरजेचे असते.
व्हिडिओ👇
- Advertisement -