Friday, July 17, 2026
Homeब्रम्हपुरीअखेर वैनगंगा नदीत बुडालेल्या दोन्ही तरुणांचे सापडले मृतदेह..

अखेर वैनगंगा नदीत बुडालेल्या दोन्ही तरुणांचे सापडले मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी तालुक्याच्या खरकाडा गावातील सात ते आठ तरुण काल रविवारी दुपारच्या सुमारास वैनगंगा नदीच्या तीरावर पार्टी करण्यासाठी गेले होते.त्यानंतर काही जणांनी आपण नदी पात्राच्या पलीकडे जाऊन पार्टी करू म्हणून सर्व तरुण नदीपात्र ओलांडून कोंढाळाच्या बाजूला आले.सर्वांचे जेवण आटोपल्यावर परत जात असतांनाच काहीजण पिंपळगाव-खरकाडा हद्दीतील नदीपात्रात आंघोळ करत होते.अश्यातच शुभम पुष्पराज बगमारे वय २४ वर्षे व शुभम विजय सहारे वय १९ वर्षे,रा.खरकाडा हे दोघेही नदीपात्रात आंघोळ करायला उतरले.पिंपळगाव-खरकाडा हद्दीतील नदीपात्रात डोह असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम बगमारे व शुभम सहारे दोघेही तरुण वाहुन गेले.सदर घटनेची माहिती मिळताच खरकडा-पिंपळगाव गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपासकार्य सुरू केले.मात्र,अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.परत आज,सोमवार २ मार्चला देसाईगंज,ब्रम्हपुरी व आरमोरी पोलिसांकडून संयुक्तरित्या शोधकार्य सुरू करण्यात आले.दरम्यान, आज सकाळपासून नदीपात्रात बोटीद्वारे शोधकार्य सुरू होते.मात्र,शोधकार्यात तरुणांचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने निलज येथील देवराम नामदेव मांढरे व प्रबिन बाबुराव मांढरे यांना पाचारण करून नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली असता दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शुभम बगमारे व एका तासानंतर शुभम सहारे या दोन्ही तरुणांचे मृतदेह रवी गावाजवळील वैनगंगा नदीपात्रात आढळून आले.दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तीतीरमारे करीत आहेत.शोधकार्यात कोंढाळा बीटाचे सहाय्यक फौजदार करणशाह हुर्रा,प्रेमली जुमनाके यांचेसह कोंढाळा गावच्या पोलीस पाटील किरण कुंभलवार यांनी विशेष सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!