Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी महिन्याच्या दीड हजाराची तारीख ठरली..!

अखेर लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी महिन्याच्या दीड हजाराची तारीख ठरली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-फेब्रुवारी महिना लोटूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा न झाल्याने
फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.त्यातच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठीचा निधी हा वित्त विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती.अशातच आता लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या दीड हजाराची तारीख ठरली असल्याची माहिती आज सोमवारी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केली आहे.मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की,८ मार्च रोजी शनिवार असला तरी त्या दिवशी महिला दिनानिमित्त विधिमंडळाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे.त्याची प्रक्रिया ही तत्पूर्वी म्हणजेच ६ ते ७ मार्च या तारखेपासूनच करण्यात येणार आहे.त्यामुळे येत्या ८ मार्च रोजी सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये जमा होणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

सूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. – गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपळू लागला आहे.सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे.राज्यात पुढील...

ताडोबात रेस्क्यू सेंटर बांधकामाच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वर्चस्व असलेल्या छोटा मटकाची मागील वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला 'ब्रम्हा' वाघाशी झुंज झाली होती.या संघर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!