Thursday, September 24, 2026
Homeनागपूरअखेर फेसबुक फ्रेंडच्या शोधात निघालेली युवती कुटुंबियांच्या स्वाधीन..

अखेर फेसबुक फ्रेंडच्या शोधात निघालेली युवती कुटुंबियांच्या स्वाधीन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-फेसबुक फ्रेंडसाठी घरच्यांना सोडून साडेआठशे किलोमीटर दूर आलेली सारिका रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप तिच्या कुटुंबीयांत पोहोचली.नववीत शिकणारी १६ वर्षीय सारिका (काल्पनिक नाव)ऑनलाइन जगताची सफर करीत असतांना काही दिवसांपूर्वी तिची फेसबुकवर चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाल्यानंतर तिने त्याच्यासाठी कुटुंबीयांचा विश्वासघात केला.त्यांना अंधारात ठेवून सारिकाने शुक्रवारी घर सोडले.तत्पूर्वी तिने मोठ्या प्रमाणात घरातील सोन्याचे दागिने सोबत घेतले आणि अहमदाबाद एक्स्प्रेसने नागपुरात पोहोचली.तिकडे मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच आईवडिलांनी सुरत पोलिसांकडे तक्रार नोंदवली.तिचे ‘ओळखी’च्याच व्यक्तीने अपहरण केल्याचेही तक्रारीत नमूद केले.त्यामुळे सुरत पोलिस तिचा शोध घेऊ लागले.इकडे सारिका शनिवारी सायंकाळी नागपुरात पोहोचली.मात्र,तिचा मित्र तिला रेल्वेस्थानकावर घ्यायला आलाच नाही.सामाजिक दायित्व जपणाऱ्या दोन ऑटोचालकांनी अस्वस्थ सारिकाला हेरले आणि रेल्वे पोलिसांना माहिती देऊन तिला पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी सपनाच्या नातेवाइकांशी संपर्क साधला.त्यांना गुजरातहून नागपुरात पोहोचायला वेळ लागणार म्हणून तिला ‘चाइल्डलाइन’च्या माध्यमातून शासकीय वसतिगृहात ठेवले.सोमवारी तिचे आईवडील आणि गडचिरोली येथील नातेवाईक नागपूर रेल्वे पोलिसांकडे पोहोचले.पोलिसांनी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून चाइल्डलाइनच्या माध्यमातून सारिकाला तिच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले.
रेल्वेस्थानकावर एका टोकाला सारिका कावऱ्याबावऱ्या अवस्थेत शहजाद आणि बादल नामक ऑटोचालकांना दिसली होती.त्यांनी लगेच रेल्वे पोलिसांना माहिती दिली.त्यामुळे सारिका सहीसलामत राहू शकली.ते कळल्यानंतर रेल्वे पोलिसांसोबतच तिच्या पालकांनीही शहजाद आणि बादलचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!