- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शहरातील पिंक बारमध्ये मालकासोबत बिल देण्यावरून सुरू असलेला वाद सोडविण्याठी गेलेल्या दिलीप चव्हाण व समीर चापले या दोन पोलिस शिपायांवर शुक्रवारी ७ मार्चला चाकू हल्ला झाला होता.यात दिलीप चव्हाणचा मृत्यू झाला,तर समीर चापले जखमी झाला होता.शहर पोलिसांनी अक्षय ऊर्फ आकाश संजू शिर्के,यश अनिल समूद वय २७ वर्षे,दोघेही रा.दादमहल वॉर्ड,चंद्रपूर तर नितेश हनुमान जाधव वय २९ वर्षे,रा.समाधी वॉर्ड,चंद्रपूर या तिघांना अटक केली होती.सदरची घटना चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट बाहेरील पिंक पॅराडाईज बार ॲण्ड रेस्टॉरंट मध्ये घडली होती.घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने काल मंगळवारी ११ मार्चच्या सायंकाळी पिंक पॅराडाईज बार ॲण्ड रेस्टॉरंटला पोलीस पथकाच्या उपस्थितीत टाळे (सिलबंद) ठोकण्यात आले आहे.सदरची कार्यवाही चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके सह चंद्रपूर शहर पोलिसांनी केली आहे.
- Advertisement -