उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- गेली चार वर्षांपासून देसाईगंज नगरपरिषद हद्दीतील पंतप्रधान आवास योजनेचा घरकुल लाभार्थ्यांचा निधी रखडला असल्याने कित्येकांची घरे अपुर्ण स्थितीत असल्याची माहिती देसाईगंज नगरसेवक तथा आरोग्य सभापती सचिन खरकाटे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः गडचिरोली जील्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे किसन नागदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून सदर बाब निदर्शनास आणून दिल्याने; अखेर पंतप्रधान आवास योजनेतील देसाईगंज नगरपरिषदेस घरकुल लाभार्थ्यांचा निधी उपलब्ध झाला असल्याने घरकुल लाभार्थ्यांनी सचिन खरकाटे यांचे आभार मानले आहे.
देसाईगंज नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिन खरकाटे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या चर्चेस येत असतात.गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर व तळमळीने धावून येत असतात.अशाच प्रकारे कोंढाळा येथील एका भीक मागणाऱ्या मुलास शिक्षणाच्या प्रवाहात आणून आजही त्या विध्यार्थ्यास मदतीचा हात देतांना दिसून येत आहेत.कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देसाईगंज नागरपरिषदेकडून सत्कार करण्यात आला.अशी अनेक सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची कामे तळमळीने केली असल्याने सर्वत्र त्यांचे नाव आजही घेतले जाते आहे.
सचिन खरकाटे यांनी घरकुल लाभार्थ्यांचा पाठपुरावा केला असल्याने नगरपरिषदेस पंतप्रधान आवास योजनेचा निधी उपलब्ध झाला आहे.येत्या काही दिवसात निधी अभावी अपूर्ण असलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.