उद्रेक न्युज वृत्त
कोरची(गडचिरोली) :- कोरची तालुक्यातील दुर्गम भागातील चर्वीदंड शाळेतील शिक्षक सुशील आडिकाने याने चक्क विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आपल्या जागेवर १५०० रुपये मानधनावर बनावट शिक्षकाची नियुक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सदर शिक्षकाला निलंबित केले आहे.
कोरची मुख्यालयापासून १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चर्वीदंड येथे १ ते ५ पर्यंतचे वर्ग आहेत.एकूण १६ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.परंतु येथील शिक्षक सुशील आडिकाने हे शाळेत येतच नव्हते.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.त्यानुसार शिक्षक सुशील आडिकने यांनी चर्वीदंड येथील एका बारावी शिक्षण झालेल्या विद्यार्थिनीला १५०० रुपये महिन्याप्रमाणे शाळेत शिकवायला ठेवल्याचे आढळून आले.अडिकाने यांनी एका बोगस शिक्षकाची नियुक्ती शाळेत केली होती.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शिक्षक सुशील आडिकाने यांना निलंबित केले आहे.