उद्रेक न्युज वृत्त
कुरूड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील ग्रामरोजगार सेवकाच्या निवडीची अखेर प्रतीक्षा संपली असून येत्या १७ फेब्रुवारी २०२३ रोजी विशेष ग्रामसभा बोलावून ग्रामरोजेगार सेवकाची निवड करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीतर्फे नोटिसाद्वारे कळविण्यात आले आहे.
सदर ग्रामसभेला कोरमची आवश्यकता नसणार आहे.नव्याने निवड करण्यात येत असलेल्या ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क.म.ग्रा.से 2011/प.क. 40 / रोहयो 10 अ मंत्रालय, मुंबई 400032 दि.2 मे 2011 अन्वये शासन निर्णानुसार होणार असल्याने कुरुड ग्रामवासिय जनतेंनी सदर विशेष ग्रामसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.