Tuesday, July 7, 2026
Homeचंद्रपूरअखेर किडनी विक्री प्रकरणातील शेतकऱ्यास ५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश वितरीत..

अखेर किडनी विक्री प्रकरणातील शेतकऱ्यास ५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश वितरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील रोशन शिवदास कुळे वय ३५ वर्षे या
शेतकऱ्याची व्यथा ऐकून दगडलाही पाझर फुटेल अशी घटना मंगळवार १६ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस येताच संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती.रोशन कुळेने ब्रम्हपुरीतील काही अवैध सावकारांकडून १ लाख रुपयाचे कर्ज घेतले होते.मात्र,चार ते पाच जणांच्या टोळीने अवाढव्य व्याज आकारत १ लाख रुपयांचा आकडा व्याजासह ७४ लाखांपर्यंत नेला होता.हे कर्ज फेडण्यासाठी रोशनने दुचाकी,ट्रॅक्टर,साडेतीन एकर शेतीही विकली; मात्र व्याजाचा डोंगर वाढतच राहिला. इतकेच नव्हे,तर पैशासाठी अश्लील शिवीगाळ, मारहाणीसह अमानुष क्रूर कृत्य करण्यात आले.२१ मार्च २०२१ पासून हा प्रकार सुरू होता.यानंतर सावकारांकडून ४० ते ६० टक्क्यांपर्यंत व्याजाची रक्कम आकारण्यात आली.७४ लाखाची रक्कम कशी परतफेड करायची?या विवंचनेत असतांना रोशनने किडनी विकण्याचा निर्णय घेतला आणि कंबोडिया देशातील नानपेन शहरात आठ लाखांमध्ये डाव्या बाजूची किडनी विकली.दरम्यान,चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली.अहवालातून डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड होताच शासनाने त्यांना न्याय देण्यासाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू केल्या होत्या.अश्यातच शासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेत काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंजूर केली होती.त्यानुसार,आज, मंगळवार १९ मे रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आलेल्या ५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश शेतकरी रोशन कुळे यांना वितरीत करण्यात आला.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील ही मदत कुळे कुटुंबीयांसाठी मोठा आधार मानली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!