उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर(नागभिड) :- नागभिड तालुक्यातील चींधीचक ही गट ग्रामपंचायत असून चींधिमाल हे गाव त्यामध्ये समाविष्ट आहे.चींधिमाल गावातील विलास सुतार यांचे कुटुंबीय काल १९ जुलै च्या रात्री झोपेत असतांना मध्यरात्री त्यांच्या अकरा वर्षीय मुलीला सापाने दंश केला असल्याची जाणीव झाली.जाणीव होऊन खात्री होताच क्षणाचाही विलंब न लावता नागभिड ग्रामीण रुग्णालयात अप्सरा विलास सुतार वय ११ वर्षीय मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दुर्दैवी मृत पावलेली अप्सरा इयत्ता पाचवी मध्ये नागभिड च्या कर्मवीर शाळेत शिक्षण घेत होती. सदरची घटना आज २० जुलै २०२३ रोजी पहाटे च्या सुमारास उघडकीस आली.