- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्याच्या उपराजधानीत ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.एक-दोन नाही तर तब्बल २४३ हुबेहूब सर्वांच्या दहा सिरीजच आणि एकाच क्रमांकाच्या एकाहून अधिक नोटा असल्याने तसेच वॉटर मार्क व नोटांचा कागद यावरून त्या बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि तहसील पोलिस ठाण्याच्या पथकाने मेयो इस्पितळाच्या बाजूला असलेल्या गार्ड लाईन परिसरातून काल बुधवारच्या मध्यरात्री दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून बनावट नोटांचे चार बंडल त्यात एकूण २४३ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.दोन्ही आरोपी हे पश्चिम बंगाल येथील असून जमीनरून हुसेन लोकमान शेख हुसेन वय २७ वर्षे,सादीपूर,मालदा व अजीम टानू शेख वय २९ वर्षे,दुलालगंज,मालदा अशी त्यांची नावे आहेत.तत्पूर्वी अश्याच प्रकारे बनावट नोटा चलनात आलेल्या असतील तर पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तहसील पोलिस ठाण्याच्या पथकास खबऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या वर्णनासह दोन व्यक्ती बनावट नोटा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली.रात्री अडीच वाजताच्या सुमारास पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.गार्ड लाईन परिसरातून खबऱ्यांनी दिलेल्या
संबंधित वर्णनाचे आरोपी जातांना दिसले.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या जवळील एका काळ्या बॅगमध्ये पॉलिथीनमध्ये ५०० रुपयांच्या २४३ बनावट नोटा आढळल्या.पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख,राहुल वाढवे,शेख रसूल,राजेश ठाकूर, फिरोज खान,विनोद कातुरे,पवन साखकर,संदीप शिरफुले यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

