Wednesday, September 9, 2026
Homeभंडारा३३ वर्षाचा कुवारा घोडा बनलेल्या मुलाचे लग्न जुळत नसेल तर यात वडिलाचा...

३३ वर्षाचा कुवारा घोडा बनलेल्या मुलाचे लग्न जुळत नसेल तर यात वडिलाचा काय दोष? – लग्नासाठी मुलाने केला वडिलाचा खून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-आई-वडील लहानाचे मोठे करतात,ते केवळ धरतीवर वजा होण्यासाठी नाही; तर जीवनात येणाऱ्या संकटांना झेलून,स्वतःच्या पायावर उभे व्हावे व जीवनाचे साफल्य करून मुलांना “जा..जगून घे..आपले पुढील जीवन” असे म्हणून सारे रान मोकळे करून देत असतात.पण,आजही अनेकजण केवळ आई-वडिलांच्याच भरवशावर जीवन जगतांना दिसून येतात. अनेकांना वडिलोपार्जित संपत्ती वा इतर ऐशो आरामचे जीवन जरी मिळाले नसले तरीही स्वबळावर उभे करण्याची ताकद उराशी बाळगून त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत.ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले,त्यांना विचारून बघा की जीवनाचे खरे संघर्ष काय असते तर..इकडे आम्ही लग्न होत नाही,माझे कुठलेही कामच होत नाही,तो पुढे गेला मी मागे राहिलो,याच बुचकळ्यात पडून ‘जैसे थे’ अवस्थेत असतो आणि दोष देतो ते आपल्या आई- वडिलांना.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात एका क्षुल्लकशा कारणासाठी पोटच्या गोळ्याने आपल्या वडिलाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.लाखांदूर तालुक्यातील आथली गावचा रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय मुलाने “माझी वय झाली तरीही माझे लग्न करून देत नाही” असे म्हणत वडिलांशी वाद घातला आणि वडिलांच्या डोक्यावर वीट मारली.यात वडील जिवानिशी ठार झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.५७ वर्षीय पुरुषोत्तम कुंभलवार असे मृत पावलेल्या वडिलाचे नाव आहे,तर प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार रा.आथली,ता.लाखांदूर असे आरोपी मुलाचे नाव आहे.प्रकरणी आई रेवता कुंभलवार यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रदीपला अटक केली आहे.
शुक्रवारच्या रात्री ३५ वर्षीय मोठा भाऊ प्रेमकुमार, आई रेवता,वडील पुरुषोत्तम आणि आरोपी प्रदीप हे सर्वजण जेवण करीत होते.जेवण झाल्याने प्रेमकुमार बाहेर गेला. यातच आरोपी प्रदीपने वडील पुरुषोत्तम यांना मोठ्या भावाचेही लग्न झाले नाही आणि माझी वय झाली तरीही माझे लग्न करून देत नाही,असे म्हणून वडिलांशी वाद घातला.वाद आणखी वाढल्याने प्रदीपने घराच्या दारा समोरील वीट उचलली आणि वडिलाच्या डोक्यावर मारली.यात डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन ते खाली पडले.जवळच असलेल्या पत्नी रेवता यांनी तात्काळ गावातील तंटामुक्त अध्यक्षांना माहिती देत पुरुषोत्तमला रुग्णवाहिकेने लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नेले.पण,तपासणी अंती डॉक्टरांनी पुरुषोत्तमला मृत घोषित केले.घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.महत्वाचे म्हणजे,३३ वर्षाचा कुवारा घोडा बनलेल्या मुलाचे लग्न जुळत नसेल तर यात वडिलाचा दोष काय? ज्या वयात शिक्षण वा आपले करिअर करायचे असते,अश्यावेळेस दुर्जनांची संगत आणि वाम मार्गाला जाऊन आयुष्याचे वाटोळे करून घेतले जाते व नंतर दोष दिले जाते ते केवळ आई-वडिलांना.सध्याच्या घडीला अनेकांचे वय निघून गेले तरीही लग्न जुळत नाही.मुली मिळणे कठीण झाले आहे.मुलीचे वडील मुलीच्या भवितव्याची तजवीज करूनच विवाहास होकार देणार की नाही,त्यामुळे सर्वप्रथम स्वतःच्या करिअरकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.वेळ कुणासाठी थांबत नाही,एकदा कां वय निघून गेली की जीवनाचे वाटोळे झाले म्हणून समजा आणि विनाशकाले विपरीत बुध्दी सुचल्याशिवय राहणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!