Wednesday, June 10, 2026
Homeनागपूर३० हजाराची लाच भोवली; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात..

३० हजाराची लाच भोवली; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सगळीकडे भ्रष्टाचाराने कळस गाठलेला असतांनाच नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज,बुधवार १० जून रोजी धडक कारवाई करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यास ३० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली.सुभाष बबन भुजबळ(प्रथम श्रेणी)मुख्य अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,प्रादेशिक कार्यालय नागपूर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
प्रकरणातील तक्रारदार हे नोंदणीकृत कंत्राटदार असून महाराष्ट्र शासनाची कामे करतात.तक्रारदार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत शासकीय कामे करण्याबाबतच्या परवान्याचे नुतनीकरणाकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केला होता.तसेच अर्जासह संबंधित कागदपत्रांचा संच व्यक्तीशः महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,प्रादेशिक कार्यालय,नागपूर येथे सादर केला होता.सदर परवान्याचे नुतनीकरणाकरिता सुभाष बबन भुजबळ,(प्रथम श्रेणी)मुख्य अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,प्रादेशिक कार्यालय नागपूर यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार यातील तक्रारदार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो(एसीबी) नागपूर कार्यालय येथे केली होती.
सदर तक्रारीचे अनुषंगाने सापळा अधिकारी यांनी लाचेची मागणीबाबत पडताळणी कारवाई केली असता आरोपी सुभाष भुजबळ यांनी तक्रारदार यांचे परवान्याचे नुतनीकरण करण्याकरिता तक्रारदार यांचेकडे ३० हजार लाचेची मागणी करून स्वतः स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने आज बुधवारी सापळा कारवाईवेळी भुजबळ याने स्वतःचे दालनात लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.प्रकरणी आरोपी सुभाष बबन भुजबळ याचेविरूध्द पोलीस स्टेशन सदर नागपूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई डॉ.दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर,श्रीमती माधुरी बाविस्कर अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर,विजय माहुलकर अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती भारती गुरनुले यांचे पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक जितेंन्द्र वैरागडे,मपोहवा अस्मिता मेश्राम,करूणा सहारे,गिता चौधरी,पोहवा आशिष वैद्य,पोशि प्रफुल भातुलकर,होमेश्वर वाईलकर,स्वाती हिडोरिया आणि वाहन चालक राजेंन्द्र जांभुळकर यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट उलटली; दोन तरुणांचा बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या बोदलकसा जलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट उलटून दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार...

घर-यादी गणनेत गडचिरोली जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर; ९९.४६ टक्के नोंदी पूर्ण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताच्या जनगणना-२०२७ अंतर्गत सध्या राज्यभर घर-यादी गणना मोहीम राबविण्यात येत आहे.१० जून २०२६ रोजीच्या आढावा अहवालानुसार राज्यात सरासरी १३.१७ टक्के घर-यादी...

पूर्वी केवळ कागदावर असणारे प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होतांना दिसत आहेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – प्रधानमंत्री यांच्या दीर्घ सेवेबद्दल महाराष्ट्राच्या वतीने केले अभिनंदन..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा...

देसाईगंज रेल्वे बोगदा मार्ग तब्बल २३ दिवस राहणार वाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ म्हणजेच रेल्वे बोगदा अंडरपास मार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक आज,बुधवार १० जून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!