Thursday, August 6, 2026
Homeनागपूर२५ वर्षीय प्रियकरासोबत पळालेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सापडली.. - अनैतिक मानवी...

२५ वर्षीय प्रियकरासोबत पळालेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सापडली.. – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने काढले शोधून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात सहजपणे अडकून,घरून पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.आई-वडील जीवाचे रान करून लहानाचे मोठे करतात.मात्र,कित्येकांच्या हृदयात
आई-वडिलांच्या प्रेमाला पाझर न फुटता चार दिवसांच्या ओळखीला प्रेमाची परिभाषा देऊन सर्वकाही मानले जात असल्याने घोर कलयुग आलेय,असे म्हणण्याची वेळ आली आहे.नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील एका गावखेड्यातून चामोर्शी शहरात शिक्षणासाठी रोज बसने ये-जा करणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तीन दिवसांपूर्वी म्हणजेच २५ जून रोजी सकाळी ९ वाजता कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली आणि दुपारी शेतात काम करणाऱ्या पित्याला अनोळखी क्रमांकावरून कॉल करून बाबा,मला शोधू नका,मी बाहेरगावी जात आहे,असे म्हणून वडिलांना काही बोलण्याची संधीही न देता मोबाइल बंद केला आणि बेपत्ता झाली.बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने बीए प्रथम वर्षाला चामोर्शीतीलच एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.अश्यातच नागपूरच्या कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुणालाही काहीही न सांगता तीन महिन्यांपूर्वी घरून निघून गेली होती.त्यानंतर आता तब्बल तीन महिन्यानंतर एका २५ वर्षीय प्रियकारासह हैदराबादमध्ये सापडली. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने तिला तिथून नागपुरात आणले.१० मार्च रोजी कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १७ वर्षीय मुलगी कुणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली होती.त्यानुसार कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली,मात्र तिचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हे शाखेच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता.तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना ती हैदराबाद येथे एका मुलासोबत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने २५ वर्षीय मुलासह १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत पोलिसांनी मुलीचे समुपदेशन करून तिला कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हवाली केले.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक ललिता तोडासे,गजेंद्रसिंग ठाकूर,सुनील वाकडे,दीपक बिंदाने,राम निरगुडवार,सचिन श्रीरामे,विलास चिंचुलकर,अभय ढोणे,अश्विनी खोडपेवार,वैशाली किन्हीकर यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!