उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- शहरातील एका व्यापाऱ्याकडे २०० रूपयाच्या बंडलमध्ये २ बनावट नोटा आढळून आल्याने ब्रम्हपुरी शहरात एकच धांदल उडाली आहे.सदर व्यापारी बँकेत रक्कम जमा करण्यासाठी गेले असता २०० रूपयाच्या बंडलमध्ये नकली नोटा असल्याचे कॅशियरच्या लक्षात आल्याने सदर बाब निदर्शनास आली.काही महिन्यांपूर्वी अश्याच २०० रुपयांच्या बनावट नोटा देसाईगंज शहरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.मात्र ते प्रकरण उघडकीस आले नव्हते.मात्र ब्रम्हपुरी शहरात एका व्यापाऱ्याकडे २ बनावट नोटा आढळून आल्या.
त्या नोटा बँकेत जमा करण्यात आल्या.मार्केटमध्ये पर्यायी व योग्य नोटाचा वापर करावा.चलनातील नोट खरी आहे काय? त्याची पुरेपूर पडताळणी करून आणि ती तपासूनच त्याचा चलनात उपयोग करावा; असे आवाहन करण्यात आले आहे.अनोळखी व्यक्तीकडून व्यवहार करताना नकली नोटा चलनात आढळून आल्यास त्वरित पोलिस स्टेशन किंवा बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा; असेही आवाहन करण्यात आले आहे.

