Saturday, September 26, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज व कुरखेडा तालुक्यात ठाण मांडून बसला जंगली हत्तींचा कळप…-कापणीयोग्य धानपीक तुडवले...

देसाईगंज व कुरखेडा तालुक्यात ठाण मांडून बसला जंगली हत्तींचा कळप…-कापणीयोग्य धानपीक तुडवले पायदळी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- ओडिसा राज्यातून आलेला जंगली हत्तींचा कळप सध्या देसाईगंज व कुरखेडा तालुक्यात ठाण मांडून बसला आहे.हत्तींना हुसकावून लावण्याचे वनविभाग व हुल्ला टिम प्रयत्न करीत असले तरी ते असफल होताना दिसत आहे.काही दिवसांपूर्वी आरमोरी तालुक्यातील रवी परिसरात हत्ती गेल्याने देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव,डोंगरगाव, अरततोंडी, विहिरगाव परिसरातील शेतक-यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.आता ऐन धानपीक कापणीच्या वेळी हत्ती परतले आहेत.हत्तींकडून कापणीयोग्य धानपीक पायदळी तुडवले जात असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे.देसाईगंज तालुक्याच्या अरततोंडी येथील नितीन बुद्धे यांच्या शेतात व शेजारच्या शेतात रात्रीच्या वेळी हत्तींनी धान पिकाची नासधूस केली. वनविभाग हत्तींना रोखण्यासाठी असमर्थ असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!