- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिवती तालुक्यातील कोदेपूर येथील नावाजलेल्या स्व.सांगाडा पाटील माध्यमिक आश्रमशाळेमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहातच गळफास लावून आत्महत्या केली.सदरची घटना काल,शनिवारी ५ ऑक्टोंबरला दुपारच्या सुमारास घडली.मंगेश जलपती आत्राम वय १८ वर्षे रा.आंबेझरी असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.आश्रमशाळेच्या भोंगळ कारभारामुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
कोदेपूर येथील आश्रमशाळेत दुपारच्या सुमारास मंगेशने आश्रमशाळेतच गळफास घेतला.ही बाब लक्षात येताच शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी त्या खोलीकडे धाव घेऊन विद्यार्थ्याचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र,तत्पूर्वीच विद्यार्थ्यांची प्राणज्योत मावळली होती.कोदेपूर येथील सांगाडा पाटील माध्यमिक आश्रमशाळेमध्ये जिवती तालुक्यासह परिसरातील विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत असतात.परंतु संस्थाचालक,मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या भोंगळ कारभारामुळे एका निरपराध
विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे.तालुक्यात संस्थाचालक,मुख्याध्यापक तसेच वसतिगृहाचे अधीक्षकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पालकांनी केली आहे.घटनेची माहिती मिळताच जिवती पोलिसांनी आश्रमशाळा गाठून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गडचांदूर येथे पाठविला आहे.
शाळेच्या वसतिगृहाचे अधीक्षक दोन दिवसांपासून रजेवर असून त्यांनी आपला पदभार इतर कुणाकडेही सोपविलेला नसल्याची माहिती आहे.आश्रमशाळेचे अधीक्षक मनमानी पद्धतीने कारभार करतात.शाळेचे मुख्याध्यापक तसेच संस्थाचालक मूकदर्शक बनून असल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. याचाच परिणाम म्हणून होतकरू आदिवासी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली.
- Advertisement -

