- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सख्खा बाप किती निर्दयी म्हणावा.पत्नी सोबत पटत नसल्याने पत्नी वेगळी राहू लागली.अश्यातच आठ वर्षीय चिमुकलीचा ताबा पत्नीकडे जाऊ नये म्हणून चक्क पोटच्या गोळ्याला निर्दयी बापाने छातीत चाकूने वार करून हत्या केल्याची घटना नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.धनश्री शेखर शेंदरे वय ८ वर्षे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.तर शेखर कृष्णराव शेंदरे वय ४६ वर्षे,रा.सरोदेनगर,नागपूर असे हैवान बापाचे नाव आहे.
आरोपी शेखरचा पत्नी शुभांगीसोबत बऱ्याच दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता.वादामुळे पत्नी शुभांगी त्याच्यापासून वेगळी राहू लागली.दोघांना आठ वर्षाची मुलगी असून वादानंतर ती शेखरकडेच होती. शेखर हा सरोदेनगरात किरायाने राहत असून
त्याच्यासोबत आई कुसुमताई,४५ वर्षीय लहान भाऊ उमेश हे देखील राहतात.मुलगी शेखरकडे राहत असल्याने शुभांगी वारंवार मुलीचा ताबा मागत होती. मात्र,शेखर त्याला नकार देत होता व त्यावरून वाद घालत होता.कायद्याच्या मार्गाने मुलगी धनश्रीचा ताबा शुभांगीकडेच जाईल याची त्याला कल्पना होती.त्यामुळे, त्याच्या डोक्यात हैवान शिरला आणि काल बुधवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास झोपेत असलेल्या धनश्रीच्या छातीत चाकूने वार केले.धनश्रीने वेदनेमुळे किंकाळ्या फोडताच आवाज ऐकून कुटूंबीयांनी धाव घेतली.पाहतात तो काय धनश्री रक्तबंबाळ अवस्थेत तडफडू लागली.तिच्याकडे पाहून दगडालाही पाझर फुटेल अशी अवस्था झाली होती.त्यानंतर,आजी व काका उमेश यांनी तातडीने धनश्रीला वाठोडा पोलिस ठाण्यात नेले व तेथून मेडिकल रुग्णालयात दाखल केले.मात्र, काही वेळातच धनश्रीने प्राण सोडला.प्रकरणी शेखरच्या आईच्या तक्रारीवरून हैवान बापावर गुन्हा दाखल करण्यात आला.
- Advertisement -

