उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज,मंगळवार ५ ऑगस्ट रोजी नाशिक विभागातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.बैठकीस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट केले. निवडणुका तर होणार,मात्र व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे.आपण ज्यांना मतदान केले,त्याची पावती व्हीव्हीपॅट मशीनवर दाखवत होती.अश्यातच विरोधी पक्षांनी यापूर्वी अनेकदा ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन मधील मतांची जुळवणी करण्याची मागणी केली होती.त्यामुळे निवडणूक आयोग मोठ्या पेच प्रसंगात पडला होता.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पण कोणत्या निवडणुका प्रथम होणार,हे अद्याप निश्चित करण्यात आले नाही.सर्व निवडणुका एकाचवेळी घेतल्या तर मनुष्यबळाची समस्या निर्माण होईल.असेही निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटले आहे. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर विरोधक आणखी निवडणूक आयोगाला धारेवर धरण्याची शक्यता बळावली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतरच; पण मतांची जुळवणी करणारी मशीन नसणार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

