Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीआता गडचिरोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 'सोलर टेक्निशियन' नवीन अभ्यासक्रम सुरू..

आता गडचिरोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘सोलर टेक्निशियन’ नवीन अभ्यासक्रम सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पर्यावरणाचे संरक्षण आणि नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत.सदरची बाब लक्षात घेता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय) गडचिरोली येथे शैक्षणिक वर्ष २०२५ पासून सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)हा एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.
हा कोर्स दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असून गडचिरोली संस्थेत २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.याशिवाय,देसाईगंज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत याच कोर्सचे दोन युनिट सुरू करण्यात आले आहेत,ज्यात एकूण ४० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुरेश चौधरी यांनी उमेदवारांना काळाची गरज ओळखून या नवीन कोर्समध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे.प्रवेश प्रक्रिया नियमित नियमांनुसारच होईल.
इच्छुक विद्यार्थी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.संस्थेत अर्ज भरण्याची आणि निश्चित करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!