Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआनंदाचा शिधा योजनेला कात्री; यंदा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे स्पष्ट..

आनंदाचा शिधा योजनेला कात्री; यंदा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे स्पष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात मोठ्या धुमधडाक्यात ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण पहिल्यांदा दिवाळीला २०२२ मध्ये करण्यात आले होते.गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,गौरी-गणपती आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने,तसेच  छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण केले होते.आनंदाचा शिधा योजनेंतर्गत राज्यातील गोर गरिबांना सणासुदीच्या काळात केवळ शंभर रुपयांमध्ये चार वस्तू मिळत होत्या.यात एक किलो रवा,एक किलो चना डाळ,एक किलो साखर आणि एक लीटर पामतेल देण्यात येत होते.अश्यातच आता लाडकी बहीण योजनेमुळे गोरगरिबांना सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपये लागतात,तर शिवभोजन थाळी साठी वर्षाला १४० कोटी रुपये तर आनंदचा शिधा साठी ५५० कोटी रुपये लागत होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील वाढते ताण बघता निधी उपलब्ध होईल तशी योजना चालवत राहू,असेही मंत्री भुजबळ म्हणाले.त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!