Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दल-नक्षल चकमक; महिला नक्षलीचा मृतदेह ताब्यात..!

सुरक्षा दल-नक्षल चकमक; महिला नक्षलीचा मृतदेह ताब्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या दंतेवाडा-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील अबुझमाडच्या थुलथुली भागातील घनदाट जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाध्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवळपास ६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.सुरक्षा दलाच्या जवानांनी राबविलेल्या शोध मोहिमे दरम्यान घटनास्थळावरून एका महिला नक्षलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.चकमकीत मारल्या गेलेल्या महिला नक्षलवाद्याची अद्याप ओळख पटलेली नसून  कुख्यात नक्षलवादी रामधरची पत्नी बिमला मारली गेल्याचा दावा करण्यात येत आहे.बिमला ही प्लाटून क्रमांक-१० ची सदस्य होती.काल,शुक्रवारी दंतेवाडा आणि नारायणपूरचे जिल्हा राखीव रक्षक(डीआरजी) पथक नक्षलवादी कारवाईसाठी गेले होते.या दरम्यान,पूर्व बस्तर विभागातील अबुझडमाडच्या घनदाट जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जवानांवर बेछूटपणे गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला.यात एका महिला नक्षिलीचा मृतदेह आढळून आला.नक्षली मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून सुरक्षा दलांनी पूर्व बस्तर विभागाला वेढा घातला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!