- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणाऱ्या सायबर विभागाच्यामार्फत चुकीची माहिती तसेच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी करण्यात येत आहे.प्रत्येक अकाउंटवर लक्ष असून, नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
समाज माध्यमे सर्वांच्या हाती असून,याचा दुरूपयोग होता कामा नये.एखादी तथ्यहीन बातमी वाऱ्यासारखी पसरविण्याचे सामर्थ्य समाज माध्यमात आहे.त्यामुळे व्हॉटसॲप व तत्सम प्रसार माध्यमांचा वापर करताना आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची दक्षता प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.ग्रुप ॲडमिनने याबाबत विशेष काळजी घ्यावी; असे आवाहन एमसीएमसीमधील समाज माध्यमांचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक यांनी केले आहे.उमेदवारांसाठी सूचना सर्व उमेदवारांना स्वतःच्या समाज माध्यमांची अधिकृत खाती (फेसबुक,व्टिटर,इन्स्टाग्राम, ब्लॉग) निवडणूक आयोगाकडे नोंद करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात सर्व समाज माध्यम प्रतिनिधींनी आपल्या माध्यमांची नोंद आयोगाकडे करावी.समाज माध्यमांवरून अफवा पसरविणे,जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे,दहशत निर्माण होणाऱ्या पोस्ट, परवानगी न घेता टाकलेल्या जाहिराती,याबाबत गंभीर गुन्ह्यांची नोंद होऊ शकते.त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- Advertisement -

