Monday, May 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसरपंचांवर जीवघेणे हल्ले निषेधार्थ राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज तीन दिवस बंद..

सरपंचांवर जीवघेणे हल्ले निषेधार्थ राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज तीन दिवस बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली.सदर घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली.मात्र,या घटनेतील मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत.त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.अशातच या घटनेचे पडसाद आता राज्यात उमटतांना दिसत आहेत.दरम्यान,बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण,धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले,अशा घटनांच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज येत्या ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान ३ दिवस बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने घेतला आहे.महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले आहे.बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे आदर्श माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.ही घटना ताजी असतांनाच पुन्हा सरपंचावरील जीवघेण्या हल्याच्या दुसऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.यावरून सरपंच संघटना आक्रमक झाली आहे.राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक असून सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा? त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी,असा सवाल करत अशा घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत.सरपंच सुरक्षेसाठी कायदा करावा,हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्या मागच्या मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा.सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे; अशी सरपंच संघटनेची मागणी आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!