Friday, October 16, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय... 'हे' तर पदाचे भुकेले….!

संपादकीय… ‘हे’ तर पदाचे भुकेले….!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादकीय

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

उद्रेक न्युज वृत्त :- ‘आईच्या गावात अन् बाराच्या भावात’ ही म्हण चुकीची नसल्याचा हल्ली प्रकार उघडकीस येऊन निदर्शनास येऊ लागला आहे. महत्वाचे म्हणजे एकीकडे निर्णय होतो ‘घरच्या खेतीत अन् घेतलेला निर्णय मिटतो आहे मातीत’.सर्वसामान्य नागरिक अमुक-तमुक काम म्हणून लोकप्रतिनिधी, लोकसेवक व ग्रामंचायत पदाधिकारी यांना नेहमीच सांगीत असतात.मात्र ‘मू पे बात व मागील दरवाज्यातून दिली जातेय थाप’ असे हात झटकण्याचा प्रयत्न हल्ली सर्वच जण करीत असल्याने काही चोरघोडे ‘हे’ तर पदाचे भुकेले व कुठलाही निर्णय घेण्यास ‘थकेले’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

काहीजण केवळ बाता मारण्यात गुंग असतात.त्यांना वाटतेय की,समोरील व्यक्तीस वळतय पण कळत नाही; असे समजतात.महत्वाचे म्हणजे समोरील व्यक्तीस कधीही कमी लेखू नये; त्यांना सगळेच कळतंय पण तुम्हाला वळण्याची संधी देतात.मात्र त्यांच्या संधीचा काहीजण पुरेपूर फायदा घेतांना दिसून येतात.त्याचाच आपले सौख्य सामावले म्हणून प्रतिज्ञा सुरू करून ‘घरावर गोटे’आणण्याचा प्रकार हल्ली सुरू झाला आहे.काहीजण राजकारणी फंडा वापरून आपला बोलबाला करतात.तर काहीजण अवैधरीत्या बांधकामे करून,पैका गोळा करून,जनतेवर अधिराज्य गाजविण्याचा प्रयत्न करतांना दिसून येतात.मात्र जनतेला असे गण्या बनविणारे चिरकाल अधिराज्य गाजवू शकणार नाही; हे तितकेच महत्त्वाचे आहे.सर्वसामान्य जनता अशांवरच विश्वास ठेऊन आपलं चांगभलं होणार या दृष्टिकोनातून बघत असतात.परंतु ‘पैक्या पायी विकला भाऊ अन् विकली ताई’अशी अवस्था सगळीकडेच निर्माण झाली असल्याने ‘सांग माझ्या डेंगण्याले’ म्हणून काही चोरघोडे निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशांच्या नजरा केवळ अमुक-तमुक बाबींवर टक्केवारी कधी व किती मिळणार याकडे त्यांचे सर्वात अगोदर लक्ष लागलेले असतात.अशातच काहीजण चोरघोड्यांची भूमिका बजावून मीच खरा योद्धा असल्याचे भासवितांना दिसून येतात.अशांना आपला बोलबाला करणारे कधीच वा मरेपर्यंत कळूच देणार नाही की,आम्ही तुमचा पुरेपूर व योग्यरित्या पद्धतशीर वापर करीत आहोत; त्यांचा एकच उद्देश असणार की, समोरच्या व्यक्तीला पुढे सरकूच द्यायचे नाही.समोरच्या व्यक्तीस पुढे सरकू दिला म्हणजे आपला झेंडा फडकला व आपण चींधीचोर झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे केवळ भूलथापा व बाता मारून झांगडगुत्ता करणे आवश्यक आहे; अन्यथा सदा-सर्वदा योग तुझा घडावा; व मी चटकन पडावा; असे कुणीही होऊ देणार नसल्याने कुठलाही निर्णय घेण्यास ‘थकेले’ असे म्हणणे चुकीचे कसे काय होऊ शकणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!