Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीशौचास गेलेल्या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न.. - मारहाणीच्या जखमा; नागपूरला हलविले..

शौचास गेलेल्या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न.. – मारहाणीच्या जखमा; नागपूरला हलविले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गावशेजारील परिसरात सायंकाळच्या सुमारास शौचास गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करून मारहाण केल्याने तरुणी बेशुध्दावस्थेत आढळून आल्याची घटना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास गडचिरोली तालुक्याच्या चामोर्शी मार्गावरील शिवणी गावात उघडकीस आली.प्रकरणी अज्ञात इसमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असावा,असा प्राथमिक अंदाज गडचिरोली पोलिसांनी व्यक्त केला आहे.
माहितीनुसार,गडचिरोली तालुक्याच्या शिवणी गावातील २३ वर्षीय काल रविवारी सायंकाळी गावशेजारील परिसरात शौचास गेली होती.परंतु बराच वेळ होऊनही ती घरी परतली नसल्याने घरच्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता,ती रस्त्याच्या कडेला शेतात बेशुध्दावस्थेत आढळून आली.अशातच तरुणीच्या डोळ्याखालील भागावर व्रण तसेच शरीरावर जखमा दिसून आल्याने तिला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.सदर तरुणी ही शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे.गडचिरोली रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेत पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!