Thursday, August 27, 2026
Homeभंडाराशेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या..

शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मेंढा-पोहरा येथील शेतकऱ्याने सततची नापिकी आणि बँकेच्या व उसनवारीच्या कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. मृत शेतकऱ्याचे नाव प्रदीप रामचंद्र दोनाडकर वय ४५ वर्ष असे आहे.सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. 

शेतकरी प्रदीप दोनाडकर हे कर्जबाजारी पणाला कंटाळले होते.शेतीसाठी लागणारा लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी; त्यामुळे बँक व इतर हात उसनवारी घेतलेली रक्कम परतफेड कशी करायची? अशातच कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी अवकाळी पाऊस व इतर समस्यांचे डोंगर त्यांना नेहमी भेडसावत असल्याने दोनाडकर यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.सदर घडलेली घटना गावात तसेच परिसरात वाऱ्यासारखी पसरली.घटनेची माहिती पोलीस प्रशासनास मिळताच; पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!