Friday, June 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता 'डीबीटी' मार्फत मिळणार निराधारांना अनुदान…-बँकेचे हेलपाटे मारणे होणार बंद…

आता ‘डीबीटी’ मार्फत मिळणार निराधारांना अनुदान…-बँकेचे हेलपाटे मारणे होणार बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते.हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते.आता मात्र,थेट डीबीटीमार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर(थेट लाभ हस्तांतरण) निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थीची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता.तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थीच्या खात्यात वर्ग केला जात होता.या प्रक्रियेस विलंब होत होता.त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थीना अनुदानासाठी बँकांत खेटे घालावे लागत होते.मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे.त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया गोंदिया विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या ३० मे पर्यंत आधारकार्ड व मोबाइल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या मुदतीत आधारकार्ड व मोबाइल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहू शकते.

निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन दिले जाते. ते आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे.यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, आधारकार्ड,बँकेचे पासबुक आणि मोबाइल नंबर, आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!