उद्रेक न्युज वृत्त :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज,सोमवारी १० जून रोजी पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी केला.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोदी यांनी काल पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली.
पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. पीएम किसान निधीच्या १७ व्या हप्त्याचे प्रकाशन अधिकृत करणाऱ्या फाइलवर त्यांनी स्वाक्षरी केली. याचा ९.३ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून २० हजार कोटी रुपयांचे वितरण होईल.यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की,आम्ही शेतकऱ्यांच्य कल्याणासाठी कटिबद्ध आहोत.कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू; यापूर्वी,पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत १६ व्या हप्त्याचे पैसे २८ फेब्रुवारी रोजी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले गेले होते.

