Thursday, September 17, 2026
Homeदेसाईगंजशाळांच्या गुणवत्तावाढीला बळ; पवित्र पोर्टलच्या माध्यमातून देसाईगंज नगरपरिषद शाळांना मिळाले सहा नवे...

शाळांच्या गुणवत्तावाढीला बळ; पवित्र पोर्टलच्या माध्यमातून देसाईगंज नगरपरिषद शाळांना मिळाले सहा नवे शिक्षक.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नगरपरिषद देसाईगंज अंतर्गत शाळांमधील शैक्षणिक मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे सहा नवनियुक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्ती आदेश बुधवार १६ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आले असून,सर्व नवनियुक्त शिक्षकांनी त्याच दिवशी संबंधित शाळांमध्ये रुजू होत आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.प्रसंगी देसाईगंज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले.तसेच नगरपरिषद अध्यक्षा लता सुंदरकर,उपाध्यक्ष नरेश विठलानी, शिक्षण सभापती बाळकृष्ण माडुलवार, पाणीपुरवठा सभापती सचिन खरकाटे तसेच नगरपरिषद केंद्राचे केंद्रप्रमुख अंबाजी आमनार यांच्या हस्ते नवनियुक्त शिक्षकांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
नवनियुक्त शिक्षक :-निलेश मनोहर खापने,सुरभी वसंता येळणे,सचिन हुरनेरदास रायपुरे,सोनाली राजेंद्र झोडगे,अमृत मारुती वाडेकर व स्वाती प्रशांत शिंदे अशी नवनियुक्त शिक्षकांची नावे असून नवीन शिक्षकांच्या नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांना विषयनिहाय व अधिक प्रभावी अध्यापन,वैयक्तिक लक्ष,विविध शैक्षणिक उपक्रम तसेच आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी अधिक सक्षमपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
विशेषतः शिक्षकांची उपलब्धता वाढल्याने वर्गनिहाय अध्यापनाचे नियोजन,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन,डिजिटल साधनांचा वापर, कृतीआधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.
“शिक्षक वाढले म्हणजे केवळ संख्या वाढत नाही; तर प्रत्येक विद्यार्थ्याला अधिक वेळ,अधिक मार्गदर्शन आणि शिकण्याच्या अधिक संधी मिळतात,” या भावनेतून नगरपरिषद शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेला या नियुक्तीमुळे नवी ऊर्जा मिळणार आहे.
नवनियुक्त सर्व शिक्षकांचे पालक,विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समित्या व शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून,त्यांच्या योगदानातून देसाईगंज नगरपरिषद शाळांच्या गुणवत्तावाढीला निश्चितच बळ मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आज,गुरुवार १७ सप्टेंबरला...

धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; आमदार मसरामांकडून कृषी विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांत धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होताच तक्रारींची तात्काळ दखल घेत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पारंपरिक कारागीर व शिल्पकारांचा टूल किट व कर्ज मंजुरी पत्र वाटप सोहळा’ संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या श्रमाला उत्पादकतेची जोड देणे आवश्यक आहे.पारंपरिक कारागीर,शिल्पकार आणि असंघटित...

सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा सफल; मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू केलेल्या उपोषणाची सांगता तब्बल २० व्या दिवशी संपुष्टात आल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!