Thursday, September 3, 2026
Homeनागपूरशालार्थ आयडी घोटाळ्यातील अटक आरोपी 'अब तक ट्वेंटी'..! - घोटाळेबाजांची टोळी; दोन...

शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटक आरोपी ‘अब तक ट्वेंटी’..! – घोटाळेबाजांची टोळी; दोन सख्खे भाऊ अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शालार्थ आयडी घोटाळा हा लहान-सहान घोटाळा नसून यात घोटाळेबाजांची टोळी असल्याचे उघड होत आहे.यापूर्वी केवळ बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात तब्बल १८ जणांना अटक करण्यात आली होती.अश्यातच आता काल रविवारी एसआयटीने लिपिक असलेल्या दोन सख्ख्या भावांना अटक केल्याने आरोपींनी ‘अब तक ट्वेंटी’ ची संख्या पार केली आहे.यात तीन शिक्षण उपसंचालक,तीन शिक्षणाधिकारी, सहा लिपिक,दोन शाळा मुख्याध्यापक,दोन शाळा संचालक,तीन सहाय्यक शिक्षक व वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे यांचा समावेश आहे.काल अटक झालेल्यात चौकशीदरम्यान हुडकेश्वर येथील श्रावणजी वाटकर उच्च प्राथमिक शाळेतील कनिष्ठ लिपिक मंगेश केशव निनावे वय ३५ वर्षे व नंदनवनमधील केशवनगर उच्च प्राथमिक शाळेतील कनिष्ठ लिपिक मनीषकुमार केशव निनावे वय ३२ वर्षे यांची नावे समोर आली.दोघेही सख्खे भाऊ असून त्यांचे राहणे ओंकारनगर येथील प्रज्योती कोर्ट अपार्टमेंट येथे आहे.या दोघांचीही नियुक्ती बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून झाली होती.मंगेशची नियुक्ती मार्च २०२३ मध्ये झाली होती.तर मनीषकुमार हा जुलै २०१९ पासून नोकरीवर लागला होता.या दोघांनीही त्यांच्या नोकरीच्या या कार्यकाळात ४१ लाख ४९ हजार इतके वेतन घेतले.त्यांनी अधिकारी व दलालांच्या माध्यमातून बोगस शालार्थ आयडी तयार करवून घेतला होता.चौकशीतून ही बाब स्पष्ट होताच पोलिसांनी दोघांनाही काल रविवारी अटक केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!