Friday, August 28, 2026
Homeनागपूरविद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. - इंधन दरवाढीचा...

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीनदा  झालेली वाढ न थांबता परत चौथ्यांदा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या भडक्याला सामोरे जावे लागणार आहे.१५ मे २०२६ रोजी पेट्रोलच्या  दरात ३ रुपये,तर डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर,२० मे रोजी दुसऱ्यांदा वाढ करून पेट्रोलच्या दरात ८६ पैसे आणि डिझेलच्या दरात ८३ पैशांची वाढ करण्यात आली होती.परत तिसऱ्यांदा म्हणजेच,शनिवार २३ मे रोजी पेट्रोलचा प्रतिलीटर दर ८७ पैसे,तर डिझेलचा प्रतिलीटर दर ९१ पैशाने वाढविण्यात आला आहे.तर काल,सोमवार २५ मे रोजी देशात चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली.त्यात पेट्रोल प्रति लीटर २.६१ रुपये,तर डिझेल २.१७ रुपयांनी महाग झाले.आतापर्यंत पेट्रोलचे भाव ७.३८ रुपयांनी,तर डिझेलचे भाव ७.०९ रुपयांनी वाढले आहेत.अश्यातच पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीमुळे नागपूर स्कूल बस व स्कूल व्हॅन संघटनेने आपल्या सेवा शुल्कात तब्बल १० ते १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे यंदा जे पालक दरमहा एक हजार भाडे देतात,त्यांना यापुढे बाराशे रुपये,तर दोन हजार रुपये भाडे देणाऱ्या पालकांना २ हजार ४०० रुपये भाडे द्यावे लागणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही या इंधनदरवाढीमुळे निर्माण झालेल्या महागाईचा फटका बसणार आहे.
दुसरीकडे,विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत सध्या सूर्य कोपला आहे.अनेक ठिकाणी तापमानाने ४५ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे.त्यामुळे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी १० जूननंतरही विदर्भातील उष्णतेची लाट अशीच कायम राहिली,तर शाळा १५ जून ऐवजी २६ जून रोजी सुरू करण्याचे संकेत दिलेत. सरकार याविषयी विचार करत असल्याचे ते म्हणालेत.
त्यातच,राज्यातील स्कूल बस संघटनेने राज्यातील शाळा आठवड्यातून तीन दिवसच भरवा आणि उर्वरित दोन दिवस ऑनलाईन वर्ग सुरू ठेवा,अशी मागणी  केली आहे.त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता आहे.
उन्हाळी सुट्ट्यानंतर जून महिन्यात पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजेल.सर्वत्र विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू येईल. पण,राज्यातील इंधन संकट दिवसागणिक अधिक गडद होत आहे.या पार्श्वभूमीवर स्कूल बस मालकांनी इंधन पुरवठा पूर्ववत होईपर्यंत नव्या शैक्षणिक वर्षात शाळा आठवड्यातून केवळ तीन दिवस भरवण्याची मागणी केली आहे.त्यांच्या मते, सध्या पेट्रोल डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे जुन्या दरात स्कूल बसची सेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.त्यामुळे शाळा एकाच सत्रात सुरू ठेवण्यात याव्यात.विशेषतः शाळा आठवड्यातून तीन दिवसच शाळा भरवा व दोन दिवस ऑनलाईन वर्ग सुरू ठेवा.राज्य सरकारने या प्रकरणी शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे १ जूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी.तसेच स्कूल बस क्षेत्राला तातडीने दिलासा देत अनुदान किंवा सवलत जाहीर करावी,अशी मागणी राज्यातील स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने म्हटले आहे.याद्वारे त्यांनी स्कूल बसचे भाडे वाढवण्याचेही संकेत दिलेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!