- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हवामान खात्याकडून येत्या ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान राज्यातील विविध भागात मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सोबतच काही भागांमध्ये बर्फवृष्टीचादेखील इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे आता विजा,पाऊस, आणि बर्फवृष्टी असे तिहेरी संकट देशावर असणार आहे.पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू-काश्मीर,हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पावसासह बर्फवृष्टीचीदेखील शक्यता वर्तविण्यात आली आहे.
थंडीची उघडीप सुरू असल्याने येत्या काही दिवसांत वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मागच्या काही दिवसांत थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून,दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री थंडी गायब असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.आयएमडीने(IMD)दिलेल्या इशाऱ्यानुसार ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
- Advertisement -

