- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शेतातील कामे आटोपून तलावालगतच्या शेतात खताच्या पिशव्या धूत असतांना जंगल परिसरातून मार्गक्रमण करत आलेल्या वाघाने अचानकपणे शेतकरी महिलेवर हल्ला चढवला.यात शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारच्या दुपारी चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी शिवारात घडली.मंदाबाई सूर्यभान मंगाम वय ६० वर्षे, रा.आगरझरी,ता.जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.मंदाबाई ही काल सोमवारच्या दुपारी शेतात खताच्या पिशव्या धूत होती.त्यावेळी वाघाने तिच्यावर हल्ला केला.त्यानंतर तिला काही अंतरापर्यंत ओढत नेले. यातच तिचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच मोहर्ली(प्रादेशिक) वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिये, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेगावकर यांच्यासह पोलीस पथक आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.वन विभागाच्या वतीने मृत महिलेचे पती सूर्यभान लक्ष्मण मंगाम यांना तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयांची रक्कम देण्यात आली. आगरझरी हे गाव ताडोबाच्या लगत असल्यामुळे या परिसरात अनेकदा वाघ व इतर वन्य प्राण्यांचा वावर असतो.त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -

