- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-नुकतेच चार दिवसांपूर्वी वर्धा शहराच्या कारला रोडलगत असलेल्या वैष्णवी कॉम्पलेक्स जवळील नखाते लेआऊट परिसरात स्वतःच्याच घरी देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी रंगेहाथ अटक करून गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतांनाच आता वर्धा जिल्ह्याच्या आर्वी शहरात एका लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून या प्रकरणी लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आर्वी शहरातील बसस्थानक परिसरातील पुरुषोत्तम लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक लॉजमध्ये पाठविला.त्यावेळी लॉजमध्ये एक महिला उपस्थित असल्याचे आढळले.यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला असता रूम क्रमांक-२०८ मध्ये संबंधित महिला व पोलिसांनी पाठविलेला बनावट ग्राहक आढळून आला. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले.चौकशीत लॉजचा मालक पुरुषोत्तम मोहनदास रावलानी हा पीडित महिलेला आपल्या लॉजमध्ये बोलावून तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले.तसेच १ जून ते ७ जुलै या कालावधीत लॉजमध्ये आलेल्या व्यक्तीची नोंद असलेले रजिस्टरही तपासण्यात आले.संबंधित महिलेला सुरक्षितपणे तिच्या घरी पाठविण्यात आले.आर्थिक फायद्यासाठी देहविक्रीचा व्यवसाय चालविल्या प्रकरणी लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

