Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी सरकारचा झटका; दोन महिन्याच्या आत "ई-केवाय सी" करा,अन्यथा लाभ बंद..

लाडक्या बहिणींसाठी सरकारचा झटका; दोन महिन्याच्या आत “ई-केवाय सी” करा,अन्यथा लाभ बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील महिलांच्या आर्थिक, आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच  कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची प्रभावी अंमलबजाणी करण्यात येत आहे.सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाव्दारे (Direct Benefit Transfer)आर्थिक लाभाची रक्कम दीड हजार रुपये खात्यात जमा करण्यात येत आहे.अश्यातच आता सरकारने पात्र लाभार्थी महिलांना “ई-केवाय सी” म्हणजेच आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे.याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने काल,गुरुवार १८ सप्टेंबर २०२५ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून लाडक्या बहिणींना मोठा झटका दिला आहे.
शासन परिपत्रकानुसार,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत आता दरवर्षी जून महिन्यापासून २ महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक असणार आहे.त्यातच योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून २ महिन्यांच्या आत पुर्ण करणे बंधनकारक आहे.सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी Aadhaar Authentication केले नाही,ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील,याची कृपया नोंद घ्यावी.असेही परिपत्रकात म्हटले आहे.त्यामुळे १८ सप्टेंबर २०२५ पासून ते १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत योजनेतील लाभार्थ्यांनी e-KYC करणे आवश्यक आहे; अन्यथा मिळणारी रक्कम ही केव्हाही बंद होऊ शकतो.
  • काय म्हटले आहे परिपत्रकात👇
मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्याचे e-kyc करावयाचे आहे.महिला व बाल विकास विभागाची Sub-AUA/Sub-KUA म्हणून UIDAI ने नियुक्त केली आहे. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्यात येत आहे. त्यानुषंगाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या Web Portal वर e-KYC ची सुविधा उपलब्ध करुन देऊन सदर योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या Web Portal वर सदरची e-KYC ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने या Web Portal वर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात e-KYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहितीचा Flowchart “परिशिष्ट- अ” मध्ये देण्यात आला आहे.म्हणजेच लाभार्थ्यांनी शासनाने दिलेल्या वरील साईटवरूनही e-KYC करता येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!