Thursday, April 30, 2026
Homeगोंदियारेल्वेच्या मेमू-डेमू गाड्या पाच दिवसांसाठी रद्द.

रेल्वेच्या मेमू-डेमू गाड्या पाच दिवसांसाठी रद्द.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-यापूर्वी दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे मंडळांतर्गत चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावर अतिरिक्त लुप लाइनचे काम सुरू करण्यात आले होते.त्यामुळे गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील काही रेल्वेगाड्या दोन दिवसाकरिता रद्द करण्यात आल्या होत्या.लुप लाईनच तसेच रेल्वे रुळाचे काम पूर्ण झाल्याने रद्द करण्यात आलेल्या गाड्या पूर्ववत सुरू झाल्या.अश्यातच आता आणखी दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापक कार्यालय बिलासपूर रेल्वे रूळच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गोंदिया-कटंगी,गोंदिया-बालाघाट,रायपूर-डोंगरगड या मेमू-डेमू गाड्या पाच दिवसांसाठी काल,शुक्रवार ११ जुलैपासून रद्द करण्यात आल्या आहेत.पाच दिवसांनंतर या गाड्या पूर्ववत त्यांच्या निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत.
  • रद्द करण्यात आलेल्या गाड्या👇
गोंदिया-कटंगी डेमू,कंटगी-गोंदिया डेमू,तुमसर रोड-बालाघाट डेमू,गोंदिया-रायपूर मेमू,डोंगरगड-गोंदिया मेमू या गाड्या १४ जुलैपर्यंत रद्द राहणार असून १५ जुलैपासून त्या पुन्हा आपल्या पूर्ववत वेळेत धावतील. तर गोंदिया-रायपूर मेमू ही गाडी १५ जुलैपर्यंत रद्द राहणार आहे.गेवरा रोड-रायपूर ही गाडी १६ जुलैपर्यंत रद्द,रायपूर-डोंगरगड मेमू,डोंगरगड रायपूर मेमू ही १६ जुलैपर्यंत रद्द राहील.या मार्गावरील डेमू आणि मेमू गाड्या पाच दिवस रद्द असल्याने मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!