Thursday, May 28, 2026
Homeनागपूररेतीच्या वाहतुकीबाबत अधिकारी,कर्मचाऱ्यांना इत्थंभूत माहिती; पण.. -आर्थिक लागेबांधे असल्याने भानगडीत पडणार कोण?

रेतीच्या वाहतुकीबाबत अधिकारी,कर्मचाऱ्यांना इत्थंभूत माहिती; पण.. -आर्थिक लागेबांधे असल्याने भानगडीत पडणार कोण?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्या स्थितीत लिलाव झालेले रेती घाट सर्वत्र बंद स्वरूपात आहेत.घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती मिळत नाही.अश्यातच इतर बांधकामासाठी रेती चढ्या दराने सहज उपलब्ध होत आहे.सदरची वाहतूक विनारॉयल्टी व ओव्हरलोड  असतांना याकडे महसूल व पोलिस विभाग दुर्लक्ष करून लगतच्या भंडारा जिल्ह्यातील रेतीला नागपूर जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ आलेत.नागपूर जिल्ह्याच्या मौदा शहरापासून अवघ्या १० ते १४ किलोमिटर अंतरावर भंडारा जिल्ह्याची सीमा सुरू होते.नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीसोबतच भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीतील तांबड्या रेतीला बाजारात भरीव मागणी आहे.शहरासह तालुक्यात सध्या शेकडो बांधकामे सुरू असून,त्यांना रोज हजारो ब्रास रेतीची आवश्यकता भासते.ही गरज भंडारा जिल्ह्यातून बोलावून पूर्ण केली जाते.रेती घाट बंद असतांना बहुतांश टिप्पर चालकांकडे दोन ते तीन ब्रास रेती वाहतुकीची रॉयल्टी असते आणि ते याच रॉयल्टीवर १० ते १५ ब्रास रेती वाहतूक करतात.रेती विनारॉयल्टी सोबतच ओव्हरलोड देखील असते.या रेतीची वाहतूक रोज रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३० वाजेपर्यंत सुरू असते.भंडारा जिल्ह्यातील रेती याच तालुक्यातून पुढे नागपूर शहरासह, रामटेक व पारशिवनी तालुक्यात व पुढे वर्धा,अमरावती जिल्ह्यांसह इतरत्र नेली जाते.या रेतीच्या वाहतुकीबाबत महसूल व पोलिस विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना इत्थंभूत माहिती आहे.मात्र,याला आळा घालण्यासाठी ते कुठलीही उपाययोजना करीत नाहीत. कागदोपत्री दाखविण्यासाठी अधूनमधून एक-दोन टिप्पर, ट्रॅक्टर पकडले जातात.मागील दोन महिन्यांपासून ते देखील पूर्णपणे बंद आहे.आर्थिक लागेबांधे असल्याने पकडण्याच्या भानगडीत पडणार कोण?असा सूर उमटू लागला आहे.
  • या मार्गांवरून होतेय अवैध रेतीची वाहतूक👇
१.अवैध रेतीची वाहतूक भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर,ठाणा येथून मौदा तालुक्यातील निहारवाणी,चिखलाबोडी,दहेगाव, बोरगाव,मौदामार्गे नागपूर.
२.भंडारा जिल्ह्यातील ठाणा,खरबी येथून मौदा तालुक्यातील गोवरी,मोहाडी,बोरगाव,मौदामार्गे नागपूर.
३.भंडारा जिल्ह्यातील सातोना,हत्तीडोई येथून मौदा तालुक्यातील आदासा,घोटमुंढरी,खंडाळा पिपरी, मांगली (तेली),मौदा मार्गे नागपूर तसेच खात, घोटीटोक मार्गे रामटेकच्या दिशेने नेली जाते.या मार्गावर रोज रात्री १५ ते २० टिप्पर विनारॉयल्टी रेती घेऊन जातात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!